'एसबीएम' मुंबई शाखेत 143 कोटींचा सायबर हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

मुंबई : 'स्टेट बँक ऑफ मॉरिशस'च्या (एसबीएम) मुंबई शाखेत 143 कोटींचा सायबर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. नरिमन पॉईंट येथील शाखेत हा हल्ला करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एसबीएमने याबाबत मागील आठवड्यात 5 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली.  

या चोरट्यांनी बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करत खातेदारांच्या विविध खात्यांमध्ये गैरव्यवहार केला. तसेच या चोरट्यांनी संबंधित खात्यांमधून सुमारे 143 कोटी रुपयांचा सायबर हल्ला केल्याचे समोर येत आहे. मात्र, याबाबत बँक प्रशासनाला समजल्यानंतर सुरक्षितेनुसार सर्व खात्यांचे ऑनलाइन व्यवहार बंद केल्याने बँकेचा मोठा अपहार टळला असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मुंबईतील शाखा व्यवस्थापक प्रकाश नारायण यांनी यावर बोलण्यास नकार दिला. तसेच याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून, सायबर तज्ज्ञांच्या साहाय्याने याप्रकरणाचा तपास केला जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai branch of State Bank of Mauritius loses Rs 143 crore to cyber fraud