डीएसपी ब्लॅकरॉकची नवी गुंतवणूक योजना 

पीटीआय
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

मुंबई - मालमत्ता व्यवस्थापनात आघाडीवर असलेल्या डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट कंपनीने ‘ब्लॅकरॉक एसीई फंड सीरिज १’ ही नवी गुंतवणूक योजना बाजारात आणली आहे. या योजेनतील निधी शेअर बाजारातील लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप शेअर्समध्ये गुंतवला जाणार आहे. १२ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान ही योजना गुंतवणूकदारांसाठी खुली आहे.

एसीई फंडाद्वारे पारंपरिक गुंतवणूकदार आणि नवख्या गुंतवणूकदारांसाठी बाजारात विस्तार करायची संधी कंपनीने उपलब्ध केली आहे. ३७ महिन्यांचा कालावधी असलेल्या या फंडातील ८० टक्के निधी शेअर्समध्ये गुंतवण्यात येईल. किमान एक हजार रुपयांपासून या फंडामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या फंडामध्ये कंपनीच्या विश्‍लेषकांच्या समूहाने शिस्तबद्ध प्रक्रियेने निवडलेल्या शेअर्सचे मिश्रण आहे. 

Web Title: mumbai news DSP Blackrock new investment plan