सोने महागले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चितता व लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवर सराफांनी खरेदीचा ओघ वाढवल्याने बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली. दिवसअखेर सोने प्रतिदहा ग्रॅमला 185 रुपयांनी वधारून 30 हजार 275 रुपयांवर बंद झाले. सलग चौथ्या सत्रात सोने महागले असून, गेल्या 20 दिवसांत त्यात 700 रुपयांची वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतही सोने चार महिन्यांच्या उच्चांकावर गेले आहे. 

मुंबई सराफा बाजारात गेल्या आठवडाभरापासून मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. सोने प्रतिदहा ग्रॅमला 185 रुपयांनी वाढले व 30 हजार 275 रुपयांवर पोहचले. चांदीच्या भावातही प्रतिकिलोला 385 रुपयांची वाढ झाली. चांदी 39 हजारांवर गेली आहे. दिवसअखेर चांदीचा भाव 39 हजार 145 रुपयांवर बंद झाला. डॉलर कमकुवत झाला असून, सोन्याची मागणी वाढली आहे. परिणामी जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रतिऔंस 0.7 डॉलरने वाढून 1 हजार 350.43 डॉलरवर बंद झाला.

Web Title: mumbai news gold

टॅग्स