शेल कंपन्यांवरील कारवाईचा धसका कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - ‘सेबी’च्या बाजारातील ३३१ शेल कंपन्यांवरील कारवाईचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी बुधवारी (ता. ९) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. दिवसअखेर सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या घसरणीसह ३१ हजार ७९७ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ७०.५० अंशांची घट होऊन तो ९ हजार ९०८ अंशांवर स्थिरावला. 

शेल कंपन्यांवरील कारवाईने गुंतवणूकदार भयभीत झाले आहेत. त्यांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील शेअर्सची विक्री केली. अणवस्त्रांबाबत अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये तणाव वाढल्याने बाजारातील दबाव वाढला. हेल्थकेअर, ऑटो आदी क्षेत्रात विक्रीचा सपाटा होता. 

फार्मा क्षेत्रातील नॅटको फार्मा, सन फार्मा, कॅडिला हेल्थ,  अरबिंदो फार्मा, अजंता फार्मा आदी शेअर घसरणीसह बंद झाले. त्याचबरोबर सिप्ला, टाटा मोटर्स, बजाज ऑटो आदी शेअर घसरणीसह बंद झाले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी १ हजार ५३९ कोटींची खरेदी केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७९८ कोटींची खरेदी केली.

Web Title: mumbai news sensex business