किरकोळ बाजारातील महागाई वाढली

पीटीआय
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - मॉन्सूनने ओढ दिल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ बाजारातील प्रमुख वस्तू आणि भाजीपाल्याच्या किमती वाढत असल्याने जुलै महिन्यातील चलनवाढ दर वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या १४ ऑगस्ट रोजी सरकार चलनवाढ निर्देशांक जाहीर करणार आहे. 

वस्तू आणि सेवा करामुळे मध्यम कालावधीत महागाई वाढेल, असा अंदाज यापुढेच व्यक्त करण्यात आला आहे. आता मॉन्सूनने पाठ फिरवल्याने भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचा भाव वधारला आहे. अन्नधान्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. परिणामी जुलै महिन्यातील चलनवाढ निर्देशांक दोन टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा अंदाज एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. चलनवाढीसंदर्भातील या सर्वेक्षणात विविध संस्थांमधील ३० अर्थतज्ज्ञांचा कौल घेण्यात आला. 

टोमॅटो, कांद्याच्या किमती वाढल्या आहे. नवा हंगाम सुरू होईपर्यंत त्यांच्या किमती जास्तच राहतील. ज्यामुळे किरकोळ चलनवाढ निर्देशांक वाढेल, असा अंदाज एचडीएफसी बॅंकेचे अर्थतज्ज्ञ तुषार अरोरा यांनी व्यक्त केला. जून महिन्यात किरकोळ चलनवाढ १.५४ टक्‍क्‍यावर होती; मात्र जुलैमध्ये १.८७ टक्‍क्‍यापर्यंत वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Web Title: mumbai news vegetables