मुंबईत सव्वा लाख घरे विक्रीविना पडून

In Mumbai, there are no lakhs of homes sold
In Mumbai, there are no lakhs of homes sold

मुंबई: मालमत्तेच्या वाढलेल्या किंमती आणि नोटाबंदीनंतर ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मुंबई महानगर प्रदेशात तब्बल 1 लाख 38 हजार घरे विक्रीविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात रेरा कायद्याची अंमलबजावणी झाल्यामुळे शिल्लक घरांची विक्री करताना विकसकांची दमछाक होण्याची शक्‍यता आहे.

बांधकाम क्षेत्राचा आढावा घेणाऱ्या "नाईट फ्रॅंक इंडिया" या संस्थेने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआर) क्षेत्रातील जानेवारी ते जून 2017 या सहा महिन्यांचा अहवाल आज प्रसिद्ध केला. "रेरा"ची अंमलबजावणी आणि डंपिंग ग्राउंडसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नव्या बांधकामास मनाई केल्याने एमएमआरमधील नव्या बांधकाम प्रकल्पांमध्ये 36 टक्‍क्‍यांची घट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. रेरांच्या निकषांमुळे विकसकांना प्रकल्पांच्या जाहीराती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी विक्रीवर परिणाम झाला असल्याचे "नाईट फ्रॅंक इंडिया" चे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. समंतक दास यांनी सांगितले. दास म्हणाले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत घरांच्या विक्रीत 8 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. "एमएमआर" क्षेत्रात 1 लाख 38 हजार 653 घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. या घरांची विक्री होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पुण्यात देखील 40 हजार 141 घरे विक्रीविना पडून असल्याचे त्यांनी सांगितले. 2012 नंतर शिल्लक साठ्याचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.

दरम्यान वसई-विरार, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली या भागात परवडणाऱ्या घरांच्या निर्मिती मोठी वाढ झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि अर्फोडेबल हाऊसिंगच्या सरकारने प्रोत्साहन दिल्याने अनेक विकसकांनी परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्राधान्य दिल्याचे दास यांनी सांगितले.

विक्रीविना पडून असलेल्या घरांची आकडेवारी 
ठिकाण संख्या
मध्य उपनगर क्षेत्र 31,758
नवी मुंबई 24,618
पश्‍चिम उपनगर क्षेत्र 22,126
पश्‍चिम उपनगर 22,051
मध्य उपनगरे 19,453
ठाणे 13,192
मध्य मुंबई 4,281
दक्षिण मुंबई 1,174
-------
एकूण 1,38,653

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com