जगातील महागड्या कॉर्पोरेट हबमध्ये बिकेसी आणि नरिमन पॉईंट

जगातील महागड्या कॉर्पोरेट हबमध्ये बिकेसी आणि नरिमन पॉईंट

नवी दिल्लीतील ‘कॅनॉट प्लेस’ पहिल्या टॉप 10 मध्ये

मुंबई:  जगभरातील महागड्या व्यापारी संकुलांमध्ये मुंबईतील दोन भागांचा सामावेश असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. तर दिल्लीमधील देखील 'कॅनॉट प्लेस' चा समावेश जगभरातील पहिल्या दहा महागड्या व्यापारी संकुलांमध्ये करण्यात आला आहे. तर मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स(बिकेसी) आणि नरिमन पॉईंट हे अनुक्रमे 29 आणि 40 व्या  क्रमांकावर आहेत. तर हाँगकाँग सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहे. 

एका सर्वेमध्ये जगभरातील कार्यालयांच्या जागांच्या किंमती नमूद केलेल्या आहेत. त्यात  मुंबईतील दोन भागांचा सामावेश करण्यात आला आहे. त्यानुसार नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस सीबीडी या व्यापारी संकुलाचे स्थान नववे आहे. येथील ‘ऑक्युपेन्सी कॉस्ट’ 143.97 डॉलर प्रति चौरस फूट अशी गणली गेली आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नरिमन पॉईंट सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट यांचा समावेश या यादीत 27व्या आणि 40व्या स्थानांवर अनुक्रमे आहे.’ बीकेसी’ची ‘ऑक्युपन्सी कॉस्ट’ 90.67 डॉलर प्रति चौरस फूट आणि नरिमन पॉईंटची ‘ऑक्युपन्सी कॉस्ट’ 68.38 डॉलर प्रति चौरस फूट अशी नमूद करण्यात आली आहे. तर हाँगकाँगच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टने यामध्ये अव्वल स्थान सलग दुसऱ्या वर्षीही राखले आहे. भाडेतत्त्वावरील आलिशान कार्यालयांसाठी येथील किंमत 322 डॉलर प्रति चौरस फूट इतकी आहे. भारतातील सीबीआरई या बांधकाम क्षेत्रातील कन्सल्टिंग फर्मने नुकताच ‘ग्लोबल प्राईम ऑफिस ऑक्युपेन्सी कॉस्ट सर्वे’ हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

दरम्यान, भारतातील प्रमुख शहरांमध्ये असलेल्या व्यापारी संकुलांची गणना ही देशी आणि जागतिक कंपन्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरत आहे. या शहरांमध्ये व्यावसायिक कार्यालय (फ्रंट ऑफिस) सुरू करण्यासाठी या व्यापारी संकुलांची निवड या कंपन्या मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. व्यावसायिक कार्यालयीन बाजारपेठांचे महत्व आणि त्याची वाढ रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या जोमाने होऊ लागली असल्याचे ‘सीबीआरई’च्या भारत, दक्षिण-पूर्व आशिया, मध्य-पूर्व आणि आफ्रिका या विभागांचे प्रमुख  आणि सीईओ अंशुमन मॅगझीन यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com