म्युच्युअल फंड गाठेल १०० लाख कोटींचा टप्पा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

भारतीय म्युच्युअल फंड व्यवसाय २०२५ पर्यंत १०० लाख कोटी रुपयांवर पोचण्याची शक्‍यता महिंद्रा म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिश्नोई यांनी व्यक्त केली आहे. मात्र यासाठी छोट्या गुंतवणूकदारांपर्यंत अधिक सक्षमपणे पोचण्याची आवश्‍यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या भारतीय म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनेतील एकूण मालमत्ता (एयूएम) २३.५७ लाख कोटींवर पोचलेली आहे. भारतात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक देशाच्या ‘जीडीपी’च्या ११ टक्के इतकी आहे, तर जगभरात हाच आकडा सरासरी ६२ टक्के आहे. त्यामुळे भारतातील म्युच्युअल फंड व्यवसाय वाढण्यास अजूनही मोठा वाव आहे.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे महत्त्व लक्षात यायला लागले आहे. ‘एसआयपी’च्या माध्यमातून यात गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल वाढतो आहे, असेही निरीक्षण बिश्नोई यांनी नोंदविले.

‘एसआयपी’ सही है !
देशातील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या ‘एसआयपी’ खात्यांची संख्या २.२९ कोटींवर पोचली आहे. छोट्या रकमेद्वारे गुंतवणूक करता येत असल्यामुळे ‘एसआयपी’ हा प्रकार सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस ‘एसआयपी’ खातेधारकांची संख्या वाढत चालली आहे. ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार दर महिन्याला सरासरी ९.८३ लाख एसआयपी खात्यांची वाढ होत आहे. महिनानिहाय ‘एसआयपी’द्वारे झालेली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढीलप्रमाणे आहे-

Web Title: mutual fund business