म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा ओघ सुरूच !

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा ओघ सुरूच !

मुंबई: देशातील म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणूक जुलैअखेर 24.5 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. अॅम्फीने यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. जुलै महिन्यात म्युच्युअल फंडात एकूण 87,087 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मुख्यत: इक्विटी, लिक्विड फंड, मनी मार्केट आणि ईटीएफ प्रकारांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जरी वाढली असली तरी म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक मात्र स्थिरच राहिली आहे. कारण निफ्टीमध्ये जुलै महिन्यात 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

मात्र शेअर बाजारातील घसरण सुरू असतानासुद्धा इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 7 टक्क्यांनी वाढली आहे. एसआयपीच्या संख्येत वाढ होत ते उचांकी स्थितीत आहेत.लिक्वीड फंडात जुलैमध्ये 56,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर जून महिन्यात लिक्विड फंडातून गुंतवणूकदारांनी 1,50,000 कोटी रुपये काढून घेतले होते.

ओपन एंडेड इक्विटी प्रकारातील फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी 8,113 कोटी रुपये गुंतवले आहेत. क्लोड एंडेड फंडांमधून 21 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. लार्ज-कॅप आणि मिड-कॅप फंडांमध्ये जुलै महिन्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूकीच्या पॅटर्नवरून गुंतवणूकदारांना लार्ज-कॅप आणि मिड-कॅप फंडांमध्ये लवकरच तेजी येण्याची शक्यता वाटत असल्याचे दिसते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com