म्युच्युअल फंड गंगाजळी 24.8 लाख कोटींवर

शुक्रवार, 10 मे 2019

मुंबई : म्युच्युअल फंडातील एकूण व्यवस्थापनेखालील मालमत्ता (एयूएम) सरलेल्या एप्रिल महिन्यात 24.8 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यात 4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी आणि  इक्विटीशीसंबंधित योजनांमध्ये गुंतवणूक वाढली असून नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेमार्फत (एसआयपी) झालेल्या गुंतवणुकीने 8 हजार 238 कोटींचा उच्चांक गाठला आहे. 

सरलेल्या एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांमधील एकूण एक लाख 460 कोटी रुपयांचा गुंतवणूक ओघ हा मुख्यत: लिक्विड फंड आणि मनी मार्केट फंडांकडून आला आहे. मात्र एक्स्चेंज ट्रेडेड फंडमधून (ईटीएफ) काही गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. लिक्विड आणि मनी मार्केट फंडांमध्ये एप्रिलमध्ये 96 हजार कोटी तर मार्च महिन्यात 51 हजार 343 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. इक्विटी आणि  इक्विटीशीसंबंधित योजनांमध्ये करबचत करणाऱ्या ईएलएसएस फंडांतील गुंतवणूक ही मार्चमधील 11 हजार 756 कोटी रुपयांवरून कमी होऊन एप्रिलमध्ये 4 हजार 229 कोटी रुपयांवर पोचली आहे.