दररोज करा 50 रुपयांची बचत, 5 वर्षांत मिळतील लाखो रिटर्न

Investment
InvestmentSakal

- शिल्पा गुजर

म्युच्युअल फंड एसआयपी इन्व्हेस्टमेंट (Mutual Fund SIP Investment) : जर तुम्ही दरमहा छोटी का होईला पण बचत केली आणि ती एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर अगदी काही वर्षांत तुम्ही चांगला निधी जमा करू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीमधील एक पर्याय आहे. ज्यात तुम्ही नियमित अल्प बचत (Small Savings) गुंतवणूकीतून, इक्विटीसारखा परतावा (Return) मिळवू शकता. जर तुम्ही तुमची अल्प बचत दर महिन्याला गुंतवणूक केली, तर पुढच्या काही वर्षांत तुम्ही लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. समजा, जर तुम्ही दिवसाला ५० रुपये वाचवत असाल आणि दर महिन्याला एसआयपीमध्ये गुंतवणूकीचा पर्याय निवडलात, तर तुम्ही 5 वर्षांकाठी 1-2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक निधी जमा करू शकता. म्युच्युअल फंड्सच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी 5 वर्षांत 20 से 30 टक्के किंवा त्याहून जास्त रिटर्न दिला आहे.

SIP Calculator: दररोज 50 रुपये वाचवल्याने काय चमत्कार होतो ते पाहुयात...

समजा तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करत आहात, तर तुमची दर महिन्याची बचत 1,500 रुपये होते. जर हेच 1500 रुपये तुम्ही SIP मध्ये गुंतवले, आणि वार्षिक 20 टक्के परतावा मिळाला तर केवळ 5 वर्षात तुम्ही 1.55 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा करु शकता. जर वार्षिक परतावा अर्थात रिटर्न 25 टक्के असेल तर 5 वर्षांत तुमचे 1.80 लाख रुपये जमा होतील. जर वार्षिक परतावा 30 टक्के असेल तर हेच 1500 रुपये 5 वर्षांत 2 लाख रुपये होतील.

या योजनांनी दिले 30% पेक्षा जास्त परतावा (Return)

म्‍यूचुअल फंड्समध्ये अशा बऱ्याच योजना आहेत ज्यात मागच्या 5 वर्षांचा परतावा हा 30 टक्क्यांपेक्षाही जास्त राहिला आहे. जसे की, ICICI प्रुडेंशियल टेक्‍नोलॉजी फंडने (ICICI Prudential Technology Fund) का 5 वर्षात 33 टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न दिला आहे. याचप्रमाणे टाटा डिजिटल इंडिया फंडने (TATA Digital India Fund) का 32 टक्के, आदित्‍य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड (Aditya Birla Sun Life Digital India Fund) ने 31 टक्क्यांपेत्रा जास्त रिटर्न दिला आहे. दुसरीकडे क्‍वांट स्‍माल कॅप (Quant Small Cap) फंडने 22 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. (या फंड्सचे रिटर्न 23सप्टेंबर 2021 पर्यंतच्या एनएवीच्या आधारे दिला गेला आहे.)

एसआयपी (SIP) गुंतवणुकीचा सोपा आणि पद्धतशीर मार्ग

एसआयपी हा गुंतवणूकीचा पद्धतशीर मार्ग असल्याचे बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के. निगम सांगतायत. गेल्या पाच वर्षांत असे अनेक फंड्स आले आहेत ज्यांचे वार्षिक एसआयपी रिटर्न ३० टक्क्यांहून अधिक आहे. यात गुंतवणूकदाराला थेट बाजाराचा धोका नाही. दुसरीकडे, पारंपरिक उत्पादनांपेक्षा अर्थात एफडी किंवा आणखी काही योजना यांच्यापेक्षा जास्त परतावा मिळतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, लक्ष्य आणि रिस्क प्रोफाइल पाहून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. एसआयपीचे वैशिष्ट्य म्हणजे आपण मासिक फक्त 100 रुपयांच्या गुंतवणूकीपासूनही सुरू करू शकता. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीची सवय लागेल, जोखीम लक्षात येईल आणि त्यावरचा परतावा सहज समजेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com