म्युच्युअल फंड मालमत्तेत 42 टक्‍क्‍यांनी वाढ 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुंबई - म्युच्युअल फंडाची एकूण मालमत्ता नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2017 अखेर 17.5 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचली आहे. खासकरून किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा वाढल्याने म्युच्युअल फंडात यंदा लक्षणीय वाढ नोंदली गेली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही मालमत्ता 12.3 लाख कोटी रुपयांच्या घरात होती. वर्षभरात त्यात तब्बल 42 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

मार्च तिमाहीमध्ये तिमाही आधारावर म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत 8 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती आयसीआरएने असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाने (ऍम्फी) एकत्रित केलेल्या आकडेवारीचा हवाला देत दिली आहे. आयसीआरएने दिलेल्या माहितीनुसार, लिक्विड, उत्पन्न आणि इक्विटी योजनांमध्ये (इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग स्कीम किंवा ईएलएसएस) अनुक्रमे रु.1.2 लाख कोटी, 96 हजार कोटी आणि 70 हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे. 

इक्विटी लिंक्‍ड योजनेत (ईएलएसएस) फेब्रुवारी महिन्यात 6,462 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, तर मार्च महिन्यात मात्र 8,216 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याचबरोबर समभाग, समभाग संलग्न बचत योजनांमधील म्हणजेच इक्विटी लिंक्‍ड योजनेतील मालमत्ता विक्रमी 5.4 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोचली आहे. 

सध्या देशात 41 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्यामध्ये कंपन्यांच्या मालमत्तेत वाढ नोंदवण्यात आली आहे; मात्र महिंद्रा म्युच्युअल फंडच्या मालमत्तेत घट झाली आहे, तर जेपी मॉर्गन म्युच्युअल फंड कंपनी या व्यवसायातून बाहेर पडली आहे. 

म्युच्युअल फंड घराण्यांमध्ये सर्वाधिक मालमत्तेसह आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल आघाडीवर कायम आहे. कंपनीची फंड मालमत्ता 2 लाख 42 हजार कोटींवर पोचली आहे, तर एचडीएफसी दुसऱ्या स्थानावर असून तिची मालमत्ता 2 लाख 37 हजार कोटी आहे. यापाठोपाठ रिलायन्स 2 लाख 10 हजार कोटी, बिर्ला सन लाईफ 1 लाख 95 हजार कोटी आणि त्यानंतर एसबीआय 1 लाख 57 हजार कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे. 

(अर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा : sakalmoney.com)

Web Title: mutual funds money