म्युच्युअल फंडाने गाठला २५ लाख कोटींचा टप्पा!

म्युच्युअल फंडाने गाठला २५ लाख कोटींचा टप्पा!

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने २५ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा नुकताच पार केला. एकरकमी तसेच ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत वाढ होताना दिसत आहे. त्यातही इक्विटी प्रकाराला गुंतवणूकदारांची विशेष पसंती दिसून येत आहे. ऑगस्ट २०१८ अखेर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २५ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. बाजारातील अन्य पर्यायांच्या तुलनेत मिळणारा अधिक परतावा, सल्लागार आणि वितरकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न; तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स ऑफ इंडिया (ॲम्फी) यासारख्या संस्था करीत असलेल्या जनजागृतीच्या उपक्रमांमुळे रिटेल म्हणजेच छोट्या गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडाकडे वाढत चालला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २०१४ मध्ये १० लाख कोटी रुपये होती. पुढच्या तीनच वर्षांत म्हणजे २०१७ पर्यंत ही रक्कम २० लाख कोटी रुपये झाली आणि आता ऑगस्टअखेर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक २५ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com