महानगर बँकेची अत्याधुनिक बँकींगकडे वाटचालः उदय शेळके

सनी सोनावळे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या निकषानुसार आपल्या बँकेचा सक्षम वर्गात समाविष्ट झाला आहे. बँकेची आर्थिक घडी उत्तम असून बँकींग क्षेत्रातील आधुनिक बदल स्विकारुन बँकेची अत्याधुनिक बँकींगकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी केले.

मुंबई येथील शिवाजी नाट्य मंदिर मध्ये महानगर बँकेची ४४ वी सर्वसाधारण सभा पार पडली, त्यावेळी शेळके बोलत होते. शेळके म्हणाले की, नोट बंदीच्या काळात देखील या आर्थिक वर्षांत बँकेला मागील ४४ वर्षातील सर्वाधीक असा ढोबळ नफा ४७ कोटी 12 लाख झाला असून, निव्वळ नफा १८ कोटी झाला आहे. बँकेच्या ठेवी 2430 कोटी आहेत तर खेळते भांडवल 2908 कोटी असून, 1496 कोटीचे कर्जवाटप केलेले आहे. याबरोबरच इंटरनेट बँकींग, रूपे डेबीट कार्ड, मोबाईल बँकींग या अद्यावत सुविधा बँक देत आहे. यावेळी उपाध्यक्ष अप्पासाहेब लामखडे, सुमन शेळके, सुरेश ढोमे, भास्कर खोसे याच्यासंह मोठ्या संख्येत सभासद उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news Moving towards the mahanagar bank banking system: Uday Shelke