नॅशनल इन्शुरन्सच्या नोंदणीला सात-आठ महिन्यांच्या कालावधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: नॅशनल इन्शुरन्सच्या शेअर बाजारातील नोंदणीला सात ते आठ महिन्यांच्या कालावधी लागेल, असे नॅशनल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के सनथ कुमार यांनी सांगितले. कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या विमा कंपनीला शेअर बाजारातील प्रवेशासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्वसाधारण विमा क्षेत्रातील पाच सरकारी कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मात्र शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि मोठ्या प्रमाणावर होणारे चढ-उतार यामुळे काही काळ नोंदणी पुढे ढकलणे योग्य ठरेल असेही के सनथ कुमार यांनी सांगितले. याशिवाय नोंदणीचा निर्णय, निर्गुंतवणूकीचे प्रमाण आणि इतर गोष्टींबाबत निर्णय झाल्यानंतर कंपन्यांना अर्थ मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागत असल्याने चालू आर्थिक वर्षात नोंदणीची शक्यता कमी असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे.

नोंदणी होणाऱ्या कंपन्या
- न्यू इंडिया ऍश्‍युरन्स लिमिटेड
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
- जीआयसी

Web Title: national insurance registration 7-8 month