‘डीएचएफएल’चे एनसीडी 22 मेपासून विक्रीस खुले

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

पुणे - दीवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. अर्थात ‘डीएचएफएल’तर्फे सिक्‍युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरची (एनसीडी) विक्री २२ मेपासून केली जाणार आहे. या डिबेंचरचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) प्रत्येकी एक हजार रुपये आहे. एकूण ३००० कोटी रुपयांचा बेस इश्‍यू साइज आणि ९००० कोटी रुपयांचा ग्रीन शू ऑप्शन असा एकूण १२,००० कोटी रुपयांचा हा सर्वांत मोठा एनसीडी इश्‍यू असेल.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, या डिबेंचरची विक्री चार जूनपर्यंत चालणार असली तरी अपेक्षेएवढा प्रतिसाद लवकर मिळाल्यास त्याची विक्री आधीदेखील थांबविली जाऊ शकते. प्रत्येक गुंतवणूकदाराला एक हजार दर्शनी मूल्य असलेल्या कमीतकमी दहा एनसीडींसाठी (१० हजार रुपये) आणि त्यापुढे एक हजार रुपयांच्या पटीत अर्ज करता येणार आहे. हे डिबेंचर ३, ५, ७ व १० वर्षे मुदतीचे असून, त्यावर ८.९० ते ९.१० टक्‍क्‍यांदरम्यान व्याज देण्यात येणार आहे. याशिवाय बदलत्या व्याजदराचा एक पर्यायही उपलब्ध असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ०.१० टक्के अधिक व्याज दिले जाणार आहे. तसेच मूळ गुंतवणूकदाराने संबंधित डिबेंचर मुदतीअखेरपर्यंत स्वतःकडे कायम ठेवले तर शेवटच्या वर्षी त्याला मुदतीनुसार १ टक्‍क्‍यांपर्यंत अतिरिक्त व्याज (लॉयल्टी गेन) मिळणार आहे, असे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ट्रेझरी प्रमुख भरत पारीख आणि व्यवसायप्रमुख (रिटेल लायबिलिटी) प्रदीप भदौरिया यांनी सांगितले. या इश्‍यूला ‘केअर’ आणि ‘ब्रिकवर्क’ या पतमानांकन संस्थांकडून ‘एएए’चा दर्जा देण्यात आला आहे. हे डिबेंचर डी-मॅट किंवा फिजिकल स्वरूपात घेता येणार असून, ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर देण्यात येणार आहेत. या एनसीडींची मुंबई; तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी होणार असल्याने गुंतवणूकदारांना मुदतीआधी पैसे हवे असल्यास ते विकताही येणार आहेत.

Web Title: NCD of DHFL will open for sale on May 22