गैरव्यवहार रोखण्यासाठी सक्षम सुशासनाची गरज

CII
CII

मुंबई - कॉर्पोरेट कंपन्यांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कंपन्यांमध्ये सक्षम सुशासन आणि जोखीम व्यवस्थापन आवश्‍यक आहे, असे मत सेबीचे कार्यकारी संचालक आनंद बैवार यांनी व्यक्त केले. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) कॉर्पोरेट फ्रॉडसंदर्भातील परिषदेत ते बोलत होते.

कंपन्यांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी नियंत्रकांनी कुठलीही भीती न बाळगता कठोर पावले उचलून सामान्य भागधारकांचे हित जपणे आवश्‍यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, गैरव्यवहार रोखण्यासाठी तत्त्व, पारदर्शकता आणि सुशासन असणे आवश्‍यक आहे. कंपन्यांमधील अंतर्गत सुशासन पारदर्शक असावे, यादृष्टीने सेबीने काही सुधारणाही केल्या आहेत.

लेखापरीक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याशिवाय कॉर्पोरेटमधील वातावरण पारदर्शक राहण्यासाठी सेबी कटिबद्ध राहील, असे बैवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com