नीरव मोदी ब्रिटनमध्येच

नीरव मोदी ब्रिटनमध्येच

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्ये असल्याच्या वृत्ताला अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला आहे. तत्पूर्वी ब्रिटनमध्ये आश्रय मिळविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. भारतात आपल्यावर राजकीय हेतूने कारवाई होण्याची शक्‍यता असल्याचा दावाही नीरवने केल्याचे वृत्तात म्हटले आहे. 

ब्रिटनचे मंत्री बॅरोनेस विल्यम्स आणि भारताचे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांच्यात आज एक बैठक पार पडली. यात भारत- ब्रिटन संबंध, दहशतवाद, तसेच प्रत्यार्पणाविषयी चर्चा झाली. ब्रिटनने भारताला सर्वतोपरी सहाकार्य करण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती किरण रिजिजू यांनी दिली. नीरवविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढावी, अशी मागणी सीबीआयने इंरपोलकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com