शेअर बाजाराची नव्या उच्चांकी पातळीला गवसणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई: मुंबई शेअर बाजाराने आज (गुरुवार) पुन्हा उच्चांकी पातळीला गवसणी घातली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 224 अंशांनी वधारला असून 31,502.88 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 62 अंशांनी वधारला असून 9,695.5 पातळीवर आहे.

सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या आज होणार्‍या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. शेअर बाजारात आयपीओनंतर शेअरच्या नोंदणीचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्स (1.37 टक्के), इन्फोसिस (1.3 टक्के), एचडीएफसी (+ 1.24 टक्के), मारुती (+ 1.1 टक्के) आणि एमएंडएम (+ 1.07 टक्के) यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर एचयुएल (-1.81 टक्के) ), लुपिन (-1.67 टक्के), ओएनजीसी (-1.51 टक्के), कोल इंडिया (-0.8 टक्के) आणि विप्रोच्या (-0.74 टक्के) शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

Web Title: The new benchmark of the stock market