कुटुंबासाठी आरामदायी टोयोटा "यारीस'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

"यारीस' या गाडीचे केवळ पेट्रोल व्हेरिअंट व्हर्जन बाजारात उपलब्ध आहे. यारीस ही गाडी पांढरा, चंदेरी, ग्रे, फॅन्टम ब्राउन, रेड, पर्ल व्हाइट या सहा रंगांत उपलब्ध आहे;

पुणे : टोयोटा कंपनीने यारीस ही सेदान प्रकारातील गाडी काही दिवसांपूर्वी बाजारात आणली आहे. अनेक नवनवीन वैशिष्ट्ये असलेली "यारीस' ही गाडी मॅन्युअल गिअर ट्रान्समिशन व ऑटोमॅटिक गिअर ट्रान्समिशन या दोनही प्रकारांत उपलब्ध आहे. विशेषतः या गाडीला सात एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. पुढील सीटसह मागील बाजूच्या खिडक्‍यांनाही एअरबॅग्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या आपतकालीन परिस्थितीत उपयोगी पडतात.

"यारीस' या गाडीचे केवळ पेट्रोल व्हेरिअंट व्हर्जन बाजारात उपलब्ध आहे. यारीस ही गाडी पांढरा, चंदेरी, ग्रे, फॅन्टम ब्राउन, रेड, पर्ल व्हाइट या सहा रंगांत उपलब्ध आहे; तसेच रूफ माउंटेड एअरव्हेंट, फ्लॅट फ्लोअरिंग, चारही चाकांना डीस्क ब्रेक, फ्रंट पार्किंग सेन्सर, ऑटो एसी, एबीएस-ईबीडी, ब्रेक असिस्ट ही इतरही वैशिष्ट्ये यारीसमध्ये आहेत.

17.8 किमी प्रतिलीटर ही गाडी एव्हरेज देते. मॅन्युअल गिअर ट्रान्समिशनची किंमत 9 लाख 29 हजार ते 12 लाख 45 हजार रुपये आहे; तर ऑटोमॅटिक गिअर ट्रान्समिशनची किंमत 9 लाख 99 हजार ते 14 लाख 7 हजार रुपये इतकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a new car Toyota yaris confortable for family