नव्याने चलनात आलेल्या फाटक्‍या नोटा बदलता येणार

पीटीआय
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मुंबई - नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या दोन हजार, दोनशे आणि इतर कमी मूल्याच्या फाटलेल्या अथवा जीर्ण नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली आहे.

मुंबई - नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या दोन हजार, दोनशे आणि इतर कमी मूल्याच्या फाटलेल्या अथवा जीर्ण नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली आहे.

नोटाबंदीनंतर नोव्हेंबर 2016 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. याचबरोबर दहा, वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणण्यात आल्या होत्या. या नोटा फाटल्या अथवा जीर्ण झाल्या असल्यास नागरिक ठराविक बॅंकांच्या शाखा अथवा रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयात त्या बदलून घेऊ शकतात. नोटांच्या परिस्थितीवर त्यांना त्याची पूर्ण अथवा अर्धी रक्कम मिळेल. रिझर्व्ह बॅंकेने यासाठी नोटा बदलून देण्याच्या नियमात दुरुस्ती केली आहे.

महात्मा गांधी मालिकेतील (नव्या) फाटलेल्या अथवा जीर्ण नोटा बदलून देण्यात येणार आहेत. हा नियम तातडीने लागू करण्यात आला आहे. पन्नास रुपये मूल्यावरील फाटक्‍या नोटा बदलून देताना त्यांचा किमान भाग किती असावा, या नियमातही बदल करण्यात आला आहे. फाटक्‍या नोटेचा पूर्ण मोबदला हवा असल्यास नोटेचा जास्तीजास्त भाग सादर करावा लागेल. नव्याने चलनात आणलेल्या नोटांचा आकार आधीच्या नोटांपेक्षा कमी असल्याने हा बदल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new currency changed

टॅग्स