आर्थिक वर्षारंभीच सुट्यांमुळे होणार आर्थिक कसरत!

टीम ई सकाळ
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे : नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच सलग सुट्या येत असल्यामुळे देशभरातील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी-उद्योजक तसेच गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहारांसाठी कसरतीला सामोरे जावे लागणार आहे.

पुणे : नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच सलग सुट्या येत असल्यामुळे देशभरातील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी-उद्योजक तसेच गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहारांसाठी कसरतीला सामोरे जावे लागणार आहे.

पुढील आठवड्यात चालू आर्थिक वर्ष संपत असून, नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांना व्यवहार करता यावेत, यासाठी 30 तसेच 31 मार्च रोजी बॅंका सुरू ठेवल्या जातात. त्यानंतर आर्थिक वर्षअखेरीच्या हिशेबपूर्तीचे काम एक एप्रिल रोजी केले जाते व त्यामुळे या दिवशी बॅंकांचे कामकाज नागरिकांसाठी बंद ठेवले जाते. यानंतर 2 एप्रिल रोजी रविवार येत असल्याने बॅंकेचे कामकाज बंद असेल. मात्र 3 एप्रिल रोजी सोमवार येत असल्यामुळे बॅंकांचे कामकाज त्यादिवसासाठी सुरू राहणार आहे. मात्र 4 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त सार्वत्रिक सुटी येत असल्याने बॅंका व शेअर बाजार बंद राहणार आहेत  

सलग येणाऱ्या सुट्यांमुळे बॅंकिंग व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे.  सुट्यांमुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना प्रामुख्याने एटीएम केंद्रांवर मोठ्या प्रमाणात विसंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. या काळात एटीएम केंद्रांमध्ये पुरेसे पैसे ठेवण्याची व्यवस्था न केली गेल्यास सर्वसामान्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

सुट्या आणि कामकाजाचे दिवस 

1 एप्रिल : आर्थिक वर्ष अखेरीच्या हिशेबपूर्तीसाठी बॅंकेचे कामकाज नागरिकांसाठी बंद राहणार, मात्र या दिवशी शेअर बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहील. 

2 एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुटी) 

3 एप्रिल : सोमवारी बॅंका व शेअर बाजाराचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील. 

4 एप्रिल : रामनवमीनिमित्त बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे. 
 

Web Title: new financial year begins with bank hassles