Video: "ऑल-न्यू बीएमडब्लू 3' भारतात लाँच 

Video: "ऑल-न्यू बीएमडब्लू 3' भारतात लाँच 

नवी दिल्ली, ता.21 ः बीएमडब्लू या लक्‍झरी कार कंपनीने सातव्या जनरेशनची "ऑल-न्यू बीएमडब्लू 3 सिरीज' भारतीय बाजारपेठेत बुधवारी सादर केली. पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय या मोटारीमध्ये उपलब्ध आहेत. भारतीय बनावटीची आलिशान सेदान श्रेणीतील ही मोटार चेन्नईत प्रकल्पात बनवण्यात आली आहे. 

बीएमडब्लू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रूद्रतेज सिंग म्हणाले, की "3 सिरीज' ही बीएमडब्लूचा आत्मा आहे. अल्टिमेट स्पोर्टस्‌ सेदान म्हणून या मोटारीला चार दशकांहून अधिक काळापासून आरामदायी अनुभव देणारी मानण्यात आले आहे. नवीन अवतारामध्ये "3 सिरीज'ने पुन्हा एकदा स्वत:लाच मागे टाकले आहे. "बिल्ट फॉर थ्रिल' आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे चालक, मोटार आणि रस्त्यादरम्यान अद्वितीय संतुलन राखले जाते. ग्राहकांना परिपूर्ण लक्‍झरी स्पोर्टस्‌ सेदानची नवीन डिझाईन, आरामदायी इंटेरिअर आणि अनेक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आकर्षून घेईल.'' 

भारतात या मोटारीची किंमत 41.40 लाखांपासून सुरू आहे. "3सिरीज'मध्ये डिजिटल व्हर्च्युअल असिस्टन्स देण्यात असून, ते "व्हॉईस कमांड'ना प्रतिसाद देते. त्यामुळे चालक बीएमडब्लू व्हर्च्युअल असिस्टन्सच्या साह्याने विविध कामे करू शकतो. 

ऑल-न्‍यू बीएमडब्लू 3सिरीज दोन डिझेल व्‍हेरिएण्‍ट्स (बीएमडब्लू 320d स्‍पोर्ट आणि बीएमडब्लू 320d लक्‍झरी लाइन) आणि एक पेट्रोल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये (बीएमडब्लू 330i M स्‍पोर्ट) उपलब्‍ध आहे.

एक्‍स-शोरूम किंमती पुढीप्रमाणे –
बीएमडब्लू 320dस्पोर्ट  : 41 लाख 40 हजार रुपये 
बीएमडब्लू 320dलक्‍झरी लाइन  :  46 लाख 90 हजार रुपये 
बीएमडब्लू 330i Mस्पोर्ट : 47 लाख 90  हजार रुपये 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com