esakal | निर्देशांकांचा नवा उच्चांक; सेन्सेक्स 53 हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

निर्देशांकांचा नवा उच्चांक; सेन्सेक्स 53 हजारांवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - जागतिक बाजारपेठांमधील सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय बाजारातही (Indian Stock Market) खरेदीची लाट आली व निर्देशांकांनी नवा उच्चांक नोंदवला. आज सेन्सेक्स 53,158 तर निफ्टी 15,924 अंशांवर बंद झाला. (New highs index Sensex 53 thousand)

यापूर्वी, सात जुलै रोजी सेन्सेक्स 53,054 अंशांवर बंद झाला होता. तर 28 जून रोजी त्याने व्यवहारादरम्यान 53,126 चा उच्चांक नोंदविला होता. मात्र, आज सेन्सेक्सने हे दोन्ही उच्चांक तोडले. आज व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 53,266 अंशांपर्यंत गेला होता. दिवसाअखेर सेन्सेक्स 254 तर निफ्टी 70 अंशांनी वाढली. मात्र, निफ्टीला अजून 16 हजारांचा आकडा गाठता आला नाही.

हेही वाचा: "भारतीय अर्थव्यवस्था 20 वर्षांत 15 ट्रिलियन डॉलरची होईल"

आज सकाळी व्यवहार सुरु झाल्यावर लगेच सेन्सेक्सने 53 हजार अंशांचा टप्पा गाठला व नंतर दिवसभर तो 53 हजारांच्या वरच होता. आयटी क्षेत्राच्या समभागांनी आज निर्देशांकांच्या वाढीत महत्वाची भूमिका बजावली. आज एचसीएल टेक पाच टक्के तर टेक महिंद्र तीन टक्के वाढला. 64 रुपयांनी वाढलेला लार्सन टुब्रो आज पुन्हा सोळाशेच्या वर जाऊन 1,609 रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा: येत्या काळात मिळवा बक्कळ पैसे, दमदार शेअर्सची यादी आणि टार्गेट्स

एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी (बंद भाव 206 रु.), टाटा स्टील (1,256 रु.) या समभागांचे दर एक ते दीड टक्का वाढले. तर भारती एअरटेल (525), महिंद्र आणि महिंद्र, एशियन पेंट, टायटन, सनफार्मा (683) या समभागांचे दर अर्धा ते एक टक्का घसरले.

आजचे सोन्याचांदीचे दर

  • सोने - 48,480 रु.

  • चांदी - 69,500 रु.

loading image