बापरे...! इन्फोसिसच्या सीईओंचा पगार आहे... 

बापरे...! इन्फोसिसच्या सीईओंचा पगार आहे... 

मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये सलील पारेख यांनी नुकताच  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा (एमडी) कार्यभार स्वीकारला आहे. कंपनी पारेख यांना तब्बल 16 कोटी 25 लक्ष रुपये वार्षिक पगार देऊ केला आहे. यामध्ये यात 6.5 कोटी रुपये फिक्स पे आणि 9.75 कोटी रुपये  व्हेरिएबल पे आणि इतर मानधनाचा समावेश करण्यात आला आहे. 

पारेख यांनी 2 जानेवारीपासून 'सीईओ'पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 10 अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीच्या मह्सुलात वाढ आणि नवीन व्यावसायिक धोरण ठरवण्याचे पारेख यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

आयटी उद्योगातील निरीक्षकांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, पारेख यांच्याकडे 'मल्टी-कल्चरल' वातावरण हाताळण्याचे कौशल्य आहे. शिवाय तंत्रज्ञान आणि विक्रीवरील पकड अधिक मजबूत करण्याची हातोटी आहे. त्यामुळे सध्याच्या संक्रमण काळात इन्फोसिसचे नेतृत्व अधिक सक्षमपणे करू शकतील.

याआधी यूबी प्रवीण राव हंगामी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम बघत होते. कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हंगामी व्यवस्थापकीय संचालक म्हणून राव यांची निवड करण्यात आली होती. राव यांच्यानंतर आता पारेख यांना इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी करण्यात आले आहे. राव मात्र कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी आणि कंपनीचे पूर्ण वेळ संचालक म्हणून कायम राहणार आहेत.

पारेख कॅपजेमिनीमधून इन्फोसिस आलेले आहेत. तेथे ते कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. पारेख यांनी कॉर्नेल विद्यापीठातून संगणकशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी घेतली आहे, आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून वैमानिक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com