‘रोख’समस्येचे निवारण करण्यास वॉलनटचा मदतीचा हात

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

तुमच्या जवळचे #ATMwithCashशोधायला मदत करणारे फीचर सादर

वॉलनट या भारतातील अग्रणी खासगी वित्त व्यवस्थापनाच्या अॅपने #ATMwithCash शोधणारे नवे फीचर सादर केले आहे. भारतातील एटीएममधून काढल्या जाणाऱ्या रकमेचे गणित करून रोख रक्कम असलेल्या एटीएमची माहिती देण्यात येणार आहे.

तुमच्या जवळचे #ATMwithCashशोधायला मदत करणारे फीचर सादर

वॉलनट या भारतातील अग्रणी खासगी वित्त व्यवस्थापनाच्या अॅपने #ATMwithCash शोधणारे नवे फीचर सादर केले आहे. भारतातील एटीएममधून काढल्या जाणाऱ्या रकमेचे गणित करून रोख रक्कम असलेल्या एटीएमची माहिती देण्यात येणार आहे.

वैद्यकीय तातडी किंवा जिथे इलेक्ट्रॉनिक देयके स्वीकारली जात नाहीत, अशा परिस्थितीत रोख रक्कम उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे असले तरी एटीएममधून रोख रक्कम काढणे ही अत्यंत त्रासदायक गोष्ट झाली आहे. कारण एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता आहे आणि लोकांना कित्येक तास लांबलचक रांगेत उभे राहावे लागत आहे.
वॉलनट आपल्या १८ लाखांहून अधिक युझर्सच्या एटीएमच्या वापरावर लक्ष ठेवणार आहे जेणेकरून देशभरातील लोकांना त्यांच्या जवळचे चालू एटीएम कोणते हे समजू शकेल. जेव्हा वॉलनटचा युझर एटीएमला यशस्वी भेट देईल तेव्हा ते अॅप त्या युझरला एटीएमसमोरील रांगेच्या परिस्थितीविषयी माहिती देईल. त्याचप्रमाणे या फीचरच्या माध्यमातून ही माहिती ते व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियांच्या माध्यमातून शेअर करू शकतात.

नव्या फीचरमध्ये खालील माहिती असेल:

  • कमी रांगअसलेले आणि रोख रक्कम असलेले एटीएम हिरव्या रंगाच्या पिनेने दाखविलेले असेल.
  • लांबलचक रांग असलेले आणि रोख रक्कम असलेले एटीएम लाल रंगाने दाखविलेले असेल.
  • ज्या एटीएममध्ये रोख रक्कम नाही/अनोळखी प्रक्रिया सुरू आहे, ते राखाडी रंगाच्या पिनेने दर्शविलेले असेल.

या घोषणेबद्दल बोलताना वॉलनटचे सहसंस्थापक अमित भोर म्हणाले, “एक खासगी वित्त व्यवस्थापन अॅप म्हणून पैसा सोपा करणे, यावर आमचा नेहमी विश्वास राहिला आहे. काळ्या पैशाच्या विरुद्ध सुरू करण्यात आलेल्या घोषणेनंतर आणि अनेक भारतीयांना होत असलेल्या कष्टांनंतर सक्रीय एटीएमबद्दल सोप्या पद्धतीने माहिती पुरवून आपण आपला खारीचा वाटा उचलू शकतो, असा आम्ही विचार केला. वॉलनट अॅपच्या माध्यमातून लाखो युझर्सकडून माहिती गोळा करण्यात येते आणि #ATMwithCashशोधण्यास प्रत्येकाला मदत करण्यात येते. जेव्हा वॉलनटचा युझर एटीएममध्ये व्यवहार करतात, ते आपली माहिती शेअर करण्याचा पर्याय निवडू शकतात आणि यामुळे त्यांच्या आसपास असलेल्या सर्वांना मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे आपण आपले डेबिट आणि क्रेडिट कार्ड अधिक प्रमाणात वापरत असल्यामुळे आपण किती पैसे खर्च केले हे समजणे कठीण जाते. वॉलनट आपोआप तुमच्या खर्चावर लक्ष ठेवते.”

Web Title: New Mobile feature helping to find #ATMwithCash