esakal | बाजारातील नवे 'एनसीडी' इश्यू
sakal

बोलून बातमी शोधा

 Non-Convertible Debenture

पण सध्या ठेवींचे व्याजदर खूप कमी झाल्याने त्यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे. अशा मनःस्थितीत असलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खासगी कंपन्यांच्या "नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर'चा (एनसीडी) पर्याय खुणावताना दिसत आहे.

बाजारातील नवे 'एनसीडी' इश्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील अस्थिरता ज्यांना नको असते, अशी मंडळी साधारणपणे बॅंक किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींत गुंतवणूक करताना दिसतात. या ठिकाणी निश्‍चित दराने परतावा मिळत असल्याने अनेक जण मुदत ठेवींत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पण सध्या ठेवींचे व्याजदर खूप कमी झाल्याने त्यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे. अशा मनःस्थितीत असलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खासगी कंपन्यांच्या "नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर'चा (एनसीडी) पर्याय खुणावताना दिसत आहे.

अलीकडच्या काळात विविध कंपन्या असे "एनसीडी' इश्‍यू बाजारात आणत आहेत. मुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा देणारा हा एक चांगला पर्याय असल्याने त्याला गुंतवणूकदारांची पसंती मिळत आहे. ‘एनसीडीं’ची नोंदणी बाजारात करण्यात येत असल्याने त्यांची मुदतीपूर्वी खरेदी-विक्री करता येते.