पॅन कार्डबाबत 5 डिसेंबरपासून होणार मोठे बदल

वृत्तसंस्था
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

मुंबई: आर्थिक व्यवहारांसाठी त्याचबरोबर इतर सरकारी कामकाजात देखील ओळखपत्र म्हणून महत्वही भूमिका बजावणाऱ्या पॅन कार्ड मध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार आता पॅन कार्डवर वडिलांचे नाव बंधनकारक असणार नाही. विशेषतः आई जर एकमेव पालक असेल तर वडिलांचे नाव उद्धृत करणे अनिवार्य नाही.  

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने (सीबीडीटी) पॅन कार्ड अर्जांमध्येच बदल केले असल्याचे सांगितले आहे. या अगोदर, वडिलांचे नाव बंधनकारक होते. मात्र, यापुढे पॅनकार्डसाठी अर्ज करताना आई-वडिलांपासून वेगळे झाल्यानंतर वडिलांचे नाव लिहिण्याची अट प्राप्तिकर विभागाने रद्द केली आहे. तसेच, अर्ज करत असताना जर अर्जदाराला आईचे नाव लावायचे असेल तर अर्जदार तसेही करु शकतो. सध्या पॅनकार्डवर अर्जदाराच्या नावाखाली वडिलांचे नाव असायचे. पण लग्नानंतर जर महिलेला आईचे नाव लावायचे असेल तरी तसा अर्ज करु शकता.

याशिवाय, एका आर्थिक वर्षात जर 2.5 लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार करणाऱ्याकडे पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. 31 मेच्या आधी यासाठी अर्ज करणे आवश्यक असणार आहे. एक वर्षामध्ये 5 लाखांहून अधिकचा घर खरेदी, विक्रीमधून मिळणारी रक्कम असेल तरी त्यांना पॅनकार्ड आवश्यक असणार आहे. येत्या 5 डिसेंबरपासून नवे नियम लागू होणार असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New PAN Card Rules To Come Into Effect From December 5