नवे पतधोरण आज जाहीर होणार  

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर खुंटल्याने रिझर्व्ह बॅंकेची चिंता वाढली आहे. यामुळे उद्या (ता.६) जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’च राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील महागाई हे महत्त्वाचे मुद्दे पतधोरण समितीसमोर आहेत. नुकताच जाहीर झालेल्या आर्थिक आकडेवारीमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही (जुलै ते सप्टेंबर) एकूण देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धिदर (जीडीपी) ७.१ टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिला. गेल्या तीन तिमाहींमधील ‘जीडीपी’ची निराशाजनक कामगिरी ठरली असल्याने पतधोरण समिती सावध पवित्रा घेईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणानंतर अर्थव्यवस्थेत रोकड टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा व्याजदरांबाबत कोणताही निर्णय घेण्याऐवजी रोकड सुलभतेला बॅंकेकडून प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New rates will be announced today