लग्नासाठी RBIच्या ‘सप्तअटी’ ठरताहेत अडचणीच्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर देशात तात्पुरता चलन तुटवडा निर्माण झालेला असताना त्याचा मोठा फटका लग्नसराईला बसला आहे. मात्र घरात लग्नकार्य असल्यास अडीच लाख रुपये काढण्याची मुभा सरकारने दिली होती. मात्र त्यासाठी ठेवलेल्या 'सप्तअटी' आता अडचणीच्या ठरत आहेत. मात्र काही लोक बनावट लग्नपत्रिका घेऊन जात असल्याने रिझर्व्ह बॅंकेने लग्नकार्यासाठी अडीच लाख रुपये काढण्यासाठी 'सप्त-अटी' ठेवल्या आहेत.

पहिली अट : लग्नकार्य असणार्‍या कुटुंबाला येत्या 30 डिसेंबरपर्यंत अडीच लाख रुपये काढता येतील. मात्र तुमच्या खात्यातून पैसे काढताना ते 8 नोव्हेंबरपूर्वी तुमच्या खात्यात जमा केलेले असणे आवश्‍यक आहे. 30 डिसेंबर किंवा त्याआधी असलेल्या लग्नासाठीच अडीच लाख काढता येणार.

दुसरी अट : वर-वधू किंवा त्यांच्या आई-वडिलांनाच अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. शिवाय वर आणि वधू वेगवेगळे अडीच लाख रुपये काढू शकतील. मात्र वर-वधू किंवा त्याच्या आई-वडिलांपैकी एकालाच अडीच लाख काढता येणार आहे.

तिसरी अट : ज्या व्यक्तीला ही रक्कम द्यायची आते, त्या व्यक्तीचे बँकेत खाते नसावे.

चौथी अट : बॅंकेतून पैसे काढताना पुरावा म्हणून लग्न पत्रिका, लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची पावती बॅंकेला दाखवणे गरजेचे आहे.

पाचवी अट : फक्त लग्नपत्रिका न देता त्यासोबत वधू-वराची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
सहावी अट : लग्नासाठी आधीच घरात पैसा साठवून ठेवला असेल आणि तो बॅंकेत भरून तेच पैसे नवीन चलनी नोटांमध्ये मिळणार नाहीत. किंवा त्या नोटा बदलून घेता येणार नाहीत.

सातवी अट : लग्न कार्यासाठी येणार खर्चाच्या पावत्या बॅंकेला दाखवणे आवश्यक आहे. म्हणजेच केटरिंग, मंडप, इत्यादीसाठी करण्यात येणारा खर्चाची पावती वधू-वराला घ्यावी लागेल.
 
Web Title: new RBI rules obstructing weddings