पाचशेच्या नोटा छपाईत चुका

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

रिझर्व्ह बॅंकेची कबुली, नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन 

नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेने पाचशेच्या नोटेच्या छपाईमध्ये चुका झाल्याचे मान्य केले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानंतर पाचशेच्या नोटेच्या छपाईमध्ये चुका आढळून आल्या होत्या. त्यावर तत्काळ रिझर्व्ह बॅंकेने स्पष्टीकरण देत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

नव्याने वितरीत केलेल्या पाचशेच्या नोटेमध्ये छोटेमोठे फरक आढळून येत आहेत. दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 500च्या नोटेवरील अशोक स्तंभ, सीरियल नंबर यांच्या आकारांमध्ये फरक आहेच, तसेच महात्मा गांधींच्या फोटोमागील काळी शाईही जास्त प्रमाणात पसरल्याचे सांगितले. याबाबत रिझर्व्ह बॅंकेच्या प्रवक्ता अल्पना किल्लावाला यांनी नोटांच्या छपाईमध्ये चुका असल्याचे मान्य केले. मात्र, लोकांनी घाबरून न जाता अशा प्रकारच्या नोटा स्वीकाराव्यात. अशा नोटा रिझर्व्ह बॅंकेला परतही करता येतील, असेही सांगण्यात आले. दरम्यान, पाचशेच्या नोटांच्या छपाईमध्ये चुका असल्याने लोकांना बनावट नोटा ओळखण्यास अडचणी येणार आहेत.

Web Title: New Rs. 500 notes with faulty printing valid: RBI