सेन्सेक्समध्ये 600 अंशांची उसळी

सेन्सेक्समध्ये 600 अंशांची उसळी

मुंबई: अर्थसंकल्पाच्या तोंडावर भारतीय शेअर बाजाराने उसळी मारली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळी घेऊन 36,188.77 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 159.95 अंशांनी वाढून 10,811.75 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ न करण्याचे संकेत मिळाल्याने जागतिक शेअर बाजार मागील चार महिन्यांच्या उचांकीवर व्यवहार करता असताना भारतीय गुंतवणूकदारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

आज प्रामुख्याने स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप सहित सर्वच निर्देशांक सकारात्मक व्यापार करत आहेत. प्रामुख्याने आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. इन्फोसिस, टीसीएस, कोटक बँक, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक एचडीएफसी इत्यादी कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. 

डीएचएफएल चार वर्षाच्या नीचांकीवर 

डीएचएफएल कंपनीत गैरव्यवहार झाल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला आहे. आज कंपनीचा शेअर 14.65 टक्क्यांनी घसरून 137.80 वर व्यवहार करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com