नीलेकणी दांपत्य निम्मी संपत्ती दान करणार

पीटीआय
शुक्रवार, 1 जून 2018

न्यूयॉर्क - ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन नीलेकणी, त्यांच्या पत्नी रोहिणी नीलेकणी यांच्यासह तीन अनिवासी भारतीय अब्जाधीश आपली निम्मी संपत्ती धर्मादाय कारणांसाठी दान करणार आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्‌स, वॉरेन बफे या प्रसिद्ध उद्योजकांनी जनहितार्थ सुरू केलेल्या एका उपक्रमाअंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.  

नीलेकणी यांसह अनिल व एलिसन भुसरी, शमशेर व शबीना वायलिल, बीआर शेट्टी आणि त्यांच्या पत्नी चंद्रकुमारी ही अनिवासी भारतीय दांपत्ये ही आपली संपत्ती दान करणार आहेत. गेल्यावर्षी ‘गिव्हिंग प्लेज’ या संस्थेशी जोडल्या गेलेल्या १४ जणांमध्ये या दांपत्यांचा समावेश आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेले भुसरी एका बिझनेस सॉफ्टवेअर फर्म ‘वर्क डे’चे सह संस्थापक आहेत. फोर्ब्जच्या यादीनुसार भुसरी यांची संपत्ती १.८ अब्ज (१८० कोटी डॉलर) आहे. ‘गिव्हिंग प्लेज’ ही संस्था जगभरातील धनाढ्य उद्योजकांना आपली अर्धी संपत्ती धर्मादाय कामांसाठी दान करण्यासाठी प्रोत्साहित करते. 

Web Title: nilekani family 50 percent property donate