नीरव मोदी, कुटुंबीयांविरोधात अजामीनपात्र वारंट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारप्रकरणी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात विशेष अंमलबजावणी संचालनालय (ईडी) न्यायालयाने आज अजामीनपात्र वारंट जारी केले आहे. यापूर्वी विशेष सीबीआय न्यायालयानेही नीरव मोदी आणि कुटुंबीयांतील 14 सदस्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, यातील दोन सदस्य सीबीआयच्या कोठडीत आहेत. बॅंकेमध्ये 13,500 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी या हिरे व्यापाऱ्यांची चौकशी सीबीआय आणि ईडीमार्फत सुरू आहे. दरम्यान, फरार असलेल्या नीरव मोदीने ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याचे काल (ता. 11) उघड झाले आहे.
Web Title: nirav modi & family Non-bailable warrant PNB Scam