मोदी, चोक्‍सीविरोधात नव्या कायद्याखाली अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

मुंबई - "फरार आर्थिक गुन्हेगार कायदा' या नव्या कायद्यांतर्गत पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी व मेहुल चोक्‍सी यांना फरारी घोषित करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी विशेष न्यायालयाला अर्ज केला. या कायद्यात फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. दोघांसाठी सीलबंद पाकिटात भिन्न अर्ज करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही फरारी घोषित केल्यानंतर सहा दिवसांत ते यंत्रणेपुढे हजर झाले नाहीत, तर त्यांच्या भारतातील तसेच परदेशातील मालमत्ता जप्त करता येऊ शकतील. यापूर्वी उद्योगपती विजय मल्ल्याबाबत ईडीने या कायद्यांतर्गत अर्ज केला होता. केंद्र सरकारने या विधेयकाला मार्चमध्ये मंजुरी दिली होती.
Web Title: Nirav Modi Mehul Choksi oppose Application under the new law