मोदी परदेशी बँकेचे कर्ज फेडण्यास तयार, पण पीएनबीचे नाही

वृत्तसंस्था
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आता दोन परदेशी बँकांच्या कर्जाची परतफेड करणार आहे. मात्र पीएनबीचे कर्ज भरण्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. परदेशी बँकांमध्ये  न्यूयॉर्कमधील एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँक (आयडीबी) या दोन बँकांचा समावेश आहे. 

नीरवने त्याच्या दोन उपकंपन्यांच्या माध्यमातून न्यूयॉर्कमधील एचएसबीसी बँकेतून 2008 मध्ये 1 कोटी 60 लाख डॉलरचे कर्ज घेतले होते. तर इस्रायल डिस्काऊंट बँकेतून 2013 मध्ये 1 लाख 20 कोटी डॉलरचे कर्ज घेतले होते. त्याने ते चुकविल्याने आता थेतील न्यायालयाने कर्जाची परतफेड करण्यास सांगितली असून बँकांना कर्जाची वसुली करण्याची परवानगी मिळाली आहे. परिणामी नीरव मोदीने या दोन्ही बँकांमधील कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवली आहे.

 केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या विनंतीच्या आधारावर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात इंटरपोलने ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. नीरवचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष परब यांच्याविरोधातही ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरचा गैरव्यवहार केल्याचा नीरव मोदीवर आरोप आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमध्येच असल्याच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दाव्याला तेथील सरकारने दुजोरा दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirav Modi to payoff outstanding loan money to two foreign banks