‘आधी नीरव मोदीला परत बोलवा’

पीटीआय
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहारानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या जप्तीच्या कारवाईला नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहारानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या जप्तीच्या कारवाईला नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने कंपनीच्या वकिलांना खडे बोल सुनावले. ‘‘आधी नीरव मोदीला भारतात परत बोलवा,’’ असे न्यायालयाने फटकारले. पंजाब नॅशनल बॅंकेला ११ हजार कोटींची फसवणूक करून फरार झालेल्या नीरव मोदीने ईडीच्या कारवाईला कंपनीच्या माध्यमातून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.  केंद्रीय अन्वेषणच्या (सीबीआय) तक्रारीनंतर ईडीने नीरव मोदीच्या देशभरातील मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली होती.

Web Title: nirav modi punjab national bank scam