नीरव मोदीविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस 

पीटीआय
मंगळवार, 3 जुलै 2018

नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या विनंतीच्या आधारावर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात इंटरपोलने ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. नीरवचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष परब यांच्याविरोधातही ही नोटीस जारी करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरचा गैरव्यवहार केल्याचा नीरव मोदीवर आरोप आहे. 

‘रेड कॉर्नर’ नोटीस २९ जूनलाच बजावण्यात आली असून, त्याबाबतची माहिती आज जाहीर करण्यात आली. या नोटिशीमुळे नीरव मोदीच्या विदेशातील हालचालींवर बंधन येणार असून, त्याला अटक होण्याचीही शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirav modi red corner notice