नीरव मोदी आणि मल्ल्या आर्थर रोडच्या एकाच कोठडीत एकमेकांना देणार सोबत?

नीरव मोदी आणि मल्ल्या आर्थर रोडच्या एकाच कोठडीत एकमेकांना देणार सोबत?

लंडन: नीरव मोदीला लंडनच्या न्यायालयाने नुकताच जामीन नाकारला आहे. मात्र या सुनावणी दरम्यान लंडन न्यायालयाच्या न्यायाधीश एम्मा अर्बटनॉट यांच्याकडून काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न होता. नीरव मोदीचे भारत सरकारला हस्तांतरण केल्यानंतर त्यालाही विजय मल्ल्याला ठेवण्यात येणार असलेल्या आर्थर रोड तुरुंगातच ठेवण्यात येईल का ? हा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकीलांना विचारला होता. 48 वर्षांचा नीरव मोदी भारत सरकारला 14,000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारासंदर्भात हवा आहे. याआधी 9,000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील आरोपी विजय मल्ल्याच्या हस्तांतरणाच्या खटल्याचीही सुनावणी याच न्यायालयात झाली होती.

विजय मल्ल्याला कोणत्या तुरुंगात ठेवणार असा लंडन न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर भारत सरकारकडून मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील कोठडीचे व्हिडिओ सादर करण्यात आले होते. त्याच सुनावणीला लक्षात ठेऊन न्यायमूर्तींनी भारत सरकारला हस्तांतरण केल्यानंतर नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावर भारत सरकारच्यावतीने  युक्तिवात करणाऱ्या वकिलांकडून नीरव मोदीला मुंबईला  पाठवण्यात येईल आणि बहुधा त्याची रवानगी मल्ल्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या आर्थर रोड तुरुंगातच केली जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. यावर मार्मिक टिप्पणी करताना न्यायमूर्तींनी मल्ल्याच्या खटल्याच्या वेळेस या तुरुंगातील कोठडीचा व्हिडिओ आम्ही बघितला असून त्यात आणखी जागा असल्याचे आम्हाला दिसले आहे, असा टोलाही लगावला होता. 

विजय मल्ल्याचे भारत सरकारला हस्तांतरण झाल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोडच्या कोठडीत करण्यात येणार असल्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्यासंदर्भातील तयारी पूर्ण केली आहे. याआधी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एक दहशतवादी अजमल कसाबला सुद्धा याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणि आता नीरव मोदीचे जर हस्तांतरण झाले तर त्यालासुद्धा आर्थर रोडमधील कोठडीतच ठेवले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com