नीरव मोदीच्या संपत्तीचा गुरुवारी "ई-लिलाव'

वृत्तसंस्था
Wednesday, 26 February 2020

पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील फरार आरोपी नीरव मोदीच्या जप्त संपत्तीचा येत्या गुरुवारपासून (ता.27) ई-लिलाव होणार आहे.

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील फरार आरोपी नीरव मोदीच्या जप्त संपत्तीचा येत्या गुरुवारपासून (ता.27) ई-लिलाव होणार आहे. सुमारे 112 वस्तूंचा ई-लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मोदीच्या मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या असून, त्यातून मिळणाऱ्या निधीतून बॅंकांची थकीत रक्कम वसूल केली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

नीरव मोदीच्या मालमत्तांचा दोन टप्प्यांत लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये महागडी चित्रे, आलिशान मोटारी, सोने आणि हिऱ्यांच्या महागडी घड्याळे आदींचा समावेश आहे. मोदीला विशेष न्यायालयाने यापूर्वीच फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे. न्यायालयाच्या परवानगीने "ईडी'ने मोदीची संपत्ती जप्त केली आहे. "सॅफ्रनआर्ट' कंपनीकडून हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यात 40 लॉट असून, 15 महागडी चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये एम. एफ हुसेन, अमृता शेरगिल यांच्या दुर्मिळ चित्रांचा समावेश आहे. याशिवाय इतरही काही चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांची विक्री करण्यात येणार आहे. त्याची किंमत कोटींच्या घरात आहे. याशिवाय मोदीच्या आलिशान मोटारींचाही लिलाव करण्यात येणार असून, यामध्ये रोल्स रॉइस घोस्ट, पोर्शे यांसारख्या महागड्या मोटारींचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirav Modi wealth to be auctioned live on Thursday