
नवी दिल्ली : लग्नाप्रमाणे आई होण्याचीही आता वयोमर्यादा सरकार ठरवण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्याप्रमाणे मुलींच्या लग्नासाठी वय वाढवण्यात आलं त्याप्रमाणे आई होण्याच्या वयोमर्यादेवर केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती निर्मला सीतारमन यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं, आता मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही विचार करणार आहोत. यासाठी एका टास्क फोर्सची निर्मिती केली जाईल. ही टास्क फोर्स सहा महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचीही माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; जेटलींचीही आठवण
तत्पूर्वी, अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांसाठी विशेष उपक्रमांना २८ हजार ६०० कोटी रुपयांची घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली. तसेच, निर्मला सीतारामन यांनी अंगणावाडी कार्यकर्त्यांना सहा लाखाहून अधिक अंगणवाडी कार्यकर्त्यांना स्मार्टफोन देण्यात आले आहेत असे सांगितले. तसेच, केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबद्दल सांगितलं, यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला.