महिला अर्थमंत्र्यांचा अर्थसंकल्प : इंदिरा गांधी आणि निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Indira Gandhi
Nirmala Sitharaman Indira Gandhi

अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प कर 2019 : नवी दिल्ली : घराच्या किल्ल्या महिलेच्या ताब्यात असतात, हे तर सार्वत्रिक सत्य आहे.. घरचं बजेट घरातील महिलेशिवाय इतर कुणालाही प्रभावीरित्या मांडणं जमत नाही.. साधं कारण आहे.. घरच्या नियोजनामध्ये आपली आजी, आई किंवा पत्नी या जितक्‍या बारकाईने नियोजन करतात, तेवढं इतरांना कदाचित जमणारही नाही.. घर सांभाळणारे हेच हात आता देश सांभाळू लागले आहेत.. 

निर्मला सीतारामन यांनी आज (शुक्रवार) भारताचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला. एका महिलेने अर्थसंकल्प मांडण्याची ही 48 वर्षांनंतरची पहिलीच घटना! यापूर्वी इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये अर्थसंकल्प मांडला होता. 

काय होतं इंदिरा गांधी यांच्या अर्थसंकल्पात? 

  • एकूण 170 कोटी रुपयांची नवी करवाढ 
  • चहा, पेट्रोल, सिगारेट, साखर, केरोसीन महागणार 
  • ग्राहकोपयोगी वस्तूंवर प्रथमच कर 
  • 1970-71 या आर्थिक वर्षातील केंद्रीय अर्थसंकल्पातील एकूण तूट 225 कोटी रुपये 
  • प्राप्तिकर सूट मर्यादा 5000 रुपये 
  • राष्ट्रीयीकृत 14 बॅंकांना नुकसान भरपाई देण्यासाठी चाळीस कोटींची तरतूद 

काय आहे निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात? 

  • भारतीय अर्थव्यवस्था साडेतीन लाख कोटी रुपयांची होणार 
  • स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना सवलत 
  • 'एक देश, एक ग्रीड'मधून सर्वांना वीज पुरविणार 
  • वर्षाला 20 लाख कोटी परकी गुंतवणुकीचे लक्ष्य 
  • 30 हजार किमीचे रस्ते बनविणार 
  • 2022 पर्यंत 1.95 कोटी नागरिकांना घरे मिळणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com