‘निसान’च्या अध्यक्षांना अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

टोकियो - निसान’ कंपनीचे अध्यक्ष कार्लोस घोसन यांना कंपनीतील गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आल्याचे वृत्त जपानमधील माध्यमांनी दिले आहे. कंपनीचा पैसा वैयक्तिक कारणांसाठी वापरणे, तसेच आपले उत्पन्न लपविणे यासारखे गंभीर आरोप कार्लोस यांच्यावर आहेत.

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर कंपनीकडून त्याची चौकशी होत आहे. यात कंपनीचे संचालक ग्रेग केली यांचाही समावेश असून, कार्लोस व केली यांनी अनेक महिन्यांपासून टोकियो एक्‍सचेंजला चुकीची माहिती देत दिशाभूल केली. परतावा किंवा नुकसान भरपाईची रक्कम जादा दाखविण्यात आली होती. मात्र, एक्‍सचेंजच्या अहवालात ही रक्कम प्रत्यक्षात कमी आढळल्याचे चौकशीत समोर आले आहे.

पदावरून हटविण्याची तयारी सुरू 
अध्यक्ष कार्लोस घोसन, संचालक ग्रेग केली यांना पदावरून हटविण्याची तयारी सुरू केल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली. कंपनीचे सीईओ हिरोतो सैकावा लवकरच याबाबतची शिफारस संचालक मंडळाकडे करतील, असेही या निवेदनात नमूद आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nisan Chairman Arrested Crime