दोषींवर कारवाई करण्याबाबत 'यूआयडीएआय'ची विचारणा
झारखंड सरकारने आधार माहिती लिक केल्याप्रकरणी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, यासाठी "यूआयडीएआय' प्रयत्नशील असल्याचे भारतीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले.
नवी दिल्ली - निवृत्तिवेतनधारकांच्या आधार कार्डची माहिती लिक केल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत भारतीय नागरिकांक प्राधिकरणाने (यूआयडीएआय) झारखंड सरकारकडे विचारणा केली.
झारखंड सरकारने आधार माहिती लिक केल्याप्रकरणी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, यासाठी "यूआयडीएआय' प्रयत्नशील असल्याचे भारतीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी खटले दाखल करून त्यांना 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असे पांडे यांनी या वेळी सांगितले.
याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या आधारची माहिती लिक झाली होती. त्यामुळे आधारच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर भारतीय नागरिकांक प्राधिकरणाने यामध्ये गंभीरपणे दखल घेत दोषींवर कारवाई करण्यासाठी झारखंड सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.