‘आयएल ॲण्ड एफएस’कडून निधीसाठी प्रस्ताव नाही

पीटीआय
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मुंबई - कर्जसंकटात सापडलेल्या ‘इन्फ्रास्ट्रक्‍चर लिजिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस’कडून (आयएल ॲण्ड एफएस) अतिरिक्त निधीसाठी कोणताही प्रस्ताव आला नसल्याची माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी बुधवारी दिली. 

‘आयएल ॲण्ड एफएस’मध्ये ‘एसबीआय’चा हिस्सा ६.४२ टक्के आहे. ‘आयएल ॲण्ड एफएस’ समूह आर्थिक अडचणीत सापडला असून, अनेक कर्जांच्या व्याज हप्त्याची परतफेड समूहाने केलेली नाही. समूहावर ९१ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाचा बोजा आहे. 

याबाबत बोलताना रजनीश कुमार म्हणाले, ‘‘सध्या अतिरिक्त निधीसाठी ‘आयएल ॲण्ड एफएस’कडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. एखादा ठोस प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल. वित्तीय बाजारपेठा स्थिर ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. उद्योग आणि भागधारकांचे हित जपण्यासाठी ‘एसबीआय’चे संचालक मंडळ योग्य निर्णय घेईल.’

एलआयसीचा मदतीसाठी हात 
‘आयएल ॲण्ड एफएस’मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) २५ टक्के हिस्सा आहे. समूहातील एलआयसी मोठा हिस्सेदार आहे. त्यामुळे समूहाला कोणत्याही परिस्थितीत बुडू दिले जाणार नाही, अशी भूमिका एलआयसीने घेतली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Fund Proposal by IL and FS