‘एअर इंडिया’च्या खरेदीत नाही कोणालाच रस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी ‘एअर इंडिया’ची विक्री करण्याचा आणखी एक प्रयत्नही अयशस्वी ठरल्याचे आज स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियाच्या ७६ टक्के हिश्‍श्‍याची विक्री करण्याचा निर्णय झाल्यानंतर इच्छुकांकडून याबाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची मुदत आज संपली. मात्र, अखेरपर्यंत एकाही कंपनीने हा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावली नसल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. कंपनीचे पाच भागांत विभाजन केले असून, त्यातील चार हिश्‍श्‍यांची विक्री होणार आहे. लवकरच विक्री धोरणाची फेरपडताळणी करण्यात येईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील विमान वाहतूक कंपनी ‘एअर इंडिया’ची विक्री करण्याचा आणखी एक प्रयत्नही अयशस्वी ठरल्याचे आज स्पष्ट झाले. अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियाच्या ७६ टक्के हिश्‍श्‍याची विक्री करण्याचा निर्णय झाल्यानंतर इच्छुकांकडून याबाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची मुदत आज संपली. मात्र, अखेरपर्यंत एकाही कंपनीने हा हिस्सा खरेदी करण्यासाठी बोली लावली नसल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. कंपनीचे पाच भागांत विभाजन केले असून, त्यातील चार हिश्‍श्‍यांची विक्री होणार आहे. लवकरच विक्री धोरणाची फेरपडताळणी करण्यात येईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, काही खासगी विमान कंपन्यांनी यात रस दाखविला होता. मात्र, पुढे काहीच कार्यवाही झाली नाही.

Web Title: no interest in air india purchasing