शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर नाही: जेटली

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारचा कसलाही हेतू नसून, वस्तू सेवा कराची (जीएसटी) आकारणी सुरु झाल्यानंतर कर संकलनात वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केला.

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारचा कसलाही हेतू नसून, वस्तू सेवा कराची (जीएसटी) आकारणी सुरु झाल्यानंतर कर संकलनात वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केला.

"गेल्या दोन वर्षांमध्ये कर संकलनाचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक वर्ष 2016-17 करिता आम्ही 16.25 लाख कोटी रुपयांचा कर गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. आता आम्ही 17 लाख कोटी रुपयांचा कर गोळा होण्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. कदाचित, याहीपेक्षा अधिक कर संकलन होऊ शकते. पुढील आर्थिक वर्षात 19.25 लाख कोटी रुपयांचा कर गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे", असे जेटली यांनी अर्थ विधेयकाबाबत बोलताना सांगितले. प्राप्तिकर विभागाला काळ्या पैशांची चौकशी करताना मिळणाऱ्या अधिकारांविषयी बोलताना ते म्हणाले की, प्राप्तिकर विभागाला स्वतःहून पुढे येऊन माहिती देणाऱ्या लोकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकताना अशा सूत्रांची माहिती जाहीर केली जाते. परंतु एकदा प्राप्तिकर कायद्यात बदल झाला की पद्धत बंद होईल, असेही त्या यावेळी म्हणाले.

केंद्र सरकार वेळेवर जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगताना ते म्हणाले की, "जुलै महिन्यापासून आम्हाला कर संकलनात मोठा बदल अपेक्षित आहे. गेल्या बारा बैठकांमध्ये जीएसटी समितीने विविध मुद्द्यांवर चर्चा केली असून कायद्याचा अंतिम मसुदा मंजुर केला आहे.'

अर्थविषयक अधिक बातम्यांसाठी क्‍लिक करा : sakalmoney.com

Web Title: No tax on farmers income : Jaitely