विल्यम डी. नॉर्डहॉस व पॉल एम. रॉमर यांना अर्थशास्त्रातील नोबेल

 विल्यम डी. नॉर्डहॉस व पॉल एम. रॉमर यांना अर्थशास्त्रातील नोबेल

स्टॉकहोम: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विल्यम डी. नॉर्डहॉस आणि पॉल एम. रॉमर या दोन अमेरिकी अर्थशास्त्रज्ञांना २०१८ चा अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. अर्थशास्त्रातील भरीव योगदानाबद्दल नॉर्डहॉस आणि रॉमर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे नोबेल समितीच्यावतीने सांगण्यात आले. 

आर्थिक वृद्धीतील दीर्घकालीन घटकांच्या पुनरुत्थान प्रक्रियेत केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.  नॉर्डहॉस यांनी वातावरणातील बदलांसह पर्यावरणीय घटकांच्या परिणामावर अभयास केला आहे तर  रॉमर यांनी तांत्रिक बदलाचे महत्त्व विशद केले आहे. 

गेल्यावर्षी अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ डॉ. रिचर्ड थेलर यांच्या संशोधनाला अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. डॉ. थेलर यांच्या ‘नज’ या सिद्धांतासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. लोकांवर सक्ती न करताही त्यांना मार्गदर्शन करण्याचा सिद्धांत म्हणजे डॉ. रिचर्ड थेलर यांची ‘नज थिअरी.’ डॉ. थेलर यांनी पारंपरिक संख्याशास्त्रीय आणि गणिती अर्थशास्त्रीय ठोकताळ्यांऐवजी लोकांच्या मनोवृत्तीला महत्त्व देत सिद्धांत मांडले आहेत 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com