नोकिया 3310 पुन्हा बाजारात

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

नोकियाच्या नव्या नोकिया 3310 मध्ये अँण्ड्रॉइड सिस्टिम नसेल. त्याचप्रमाणे नव्या नोकिया 3310 ची किंमत अंदाजे 4,150 रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच नवीन नोकिया 3310 हा स्मार्टफोन नसून एक फिचर फोन असेल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई: लोकप्रिय मोबाईल कंपनी असलेल्या 'नोकिया'चा फोन पुन्हा एकदा बाजारात येऊ घातला आहे. मोबाईल फोनच्या दुनियेत नोकियाने सर्वप्रथम 3310 हा मोबाईल फोन सादर केला होता. आता परत याच क्रमांकाचा फोन 'नोकिया' सादर करण्याच्या तयारीत आहे.

नोकियाचे फोन उच्च क्षमतेची बॅटरी आणि टिकाऊपणा प्रसिद्ध होते. त्यामुळे याचाच फायदा घेत नोकियाने सुपरहिट '3310' हे मॉडेल पुन्हा बाजारात आणले आहे. नोकियाने यात पूर्वीच्या 3310 या मॉडेलच्या तुलनेत बरेच बदल केले आहेत. नोकियाची पालक कंपनी असलेल्या एचएमडी ग्लोबल यांनी हा मोबाईल सादर करण्याचे जाहीर केले आहे. नोकिया आता अँण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरणार आहे.

मात्र नोकियाच्या नव्या नोकिया 3310 मध्ये अँण्ड्रॉइड सिस्टिम नसेल. त्याचप्रमाणे नव्या नोकिया 3310 ची किंमत अंदाजे 4,150 रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच नवीन नोकिया 3310 हा स्मार्टफोन नसून एक फिचर फोन असेल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

नव्या नोकिया 3310 ची काही खास वैशिष्ट्ये:

1) नोकियाचा 3310 लाल, हिरवा, पिवळा अशा रंगामध्ये उपलब्ध असेल
2) मोबाईलमधून बॅटरी वेगळी करता येणार आहे.
3) नव्या 3310 मध्ये 16 जीबी बिल्ट-इन मेमरी देण्यात आली आहे, तसेच मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येईल.
4) नोकीयच्या नवीन 3310 ला यू.एस.बी चार्जर देण्यात आला आहे
5) 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून, फ्लॅशची सुविधा देखील देण्यात आली आहे.
6) यात 1200 एम.ए.एचची बॅटरी आहे
7) फोनमध्ये ब्ल्यू टूथ कनेक्टिव्हीटी आणि एमपी थ्री प्लेअर देण्यात आला आहे.

Web Title: Nokia 3310 is back