नोटाटंचाई 70 हजार कोटींची 

पीटीआय
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - सरकार आणि रिझर्व्ह बॅंक नोटाटंचाई नसल्याचा दावा करीत असली, तरी ‘एसबीआय रिसर्च’ने ७० हजार कोटी रुपयांचा चलन तुटवडा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एटीएममधून महिन्याला काढण्यात येणाऱ्या रकमेच्या एक तृतीयांश हे चलन आहे. 

देशभरातील नोटाटंचाईवर सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडून स्थिती सर्वसाधारण असल्याचा दावा केला जात आहे. यावर ‘एसबीआय रिसर्च’ने म्हटले आहे, की मार्च २०१८ अखेर वितरणातील चलन १९.४ ट्रिलियन रुपये असायला हवे होत. प्रत्यक्षात ते १७.५ ट्रिलियन रुपये होते. यामुळे १.९ ट्रिलियन रुपयांचा यात फरक आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतरच्या महिन्यांमध्ये डिजिटल व्यवहारात मोठी घसरण होऊन ते १.२ ट्रिलियन रुपयांवर आले आहेत. वितरणातील एकूण चलनटंचाई सुमारे ७० हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. 

Web Title: Note scarcity